आऊटडोअर मध्ये भटकंती, त्या सोबतच कामातून जोडला गेलेला पोटापाण्याचा व्यवसाय अस सगळंच सुरु असताना; कित्येक वर्ष लोटली गेली; अनुभव, प्रयत्न आणि पराकाष्ठा उराशी बाळगून "2019 या वर्षी High walk कंपनीची आम्ही नुकतीच स्थापना केली होती. आणि म्हणूनच भविष्यातील काही भटकंती इव्हेंट आयोजित करण्यात आले! आणि त्यातील पहिला इव्हेंट ठरवण्यात आला; तो म्हणजे काजवा दर्शन!
अश्या प्रकारचे आऊटडोअर उपक्रम राबवणे ही बाब तशी आमच्या साठी नवीन न्हाती. पण आपण स्वतः हा उभारलेल्या कंपनी माध्यातून उपक्रम राबविण्यात ही वेगळीच मजा, ऊर्जा आणि उत्सुकता होता.
महाराष्ट्रात; अहमदनगर जिल्ह्यातील, अकोले तालुक्यात; पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध असलेला भंडारदरा हा परिसर; काजव्यांन ( Fireflies) साठी सुद्धा तितकाच प्रसिद्ध आहे!
आम्ही ठरल्या प्रमाणे पुण्यातील सेनापती बापट रोड जवळ असलेल्या; पत्रकार नगर येथील बारामती हॉस्टेल शेजारील "संजय नानकर' सरांच्या मेडिकल स्टोअर इथून या कार्यक्रमाची सुरुवात केली.येत्या शनिवारी म्हणजे दिनांक 1 जून 2019 रोजी जमलेल्या सहभागी लोकांची हजेरी घेऊन काही नियम, अटी आणि सूचना दिल्या आणि दुपारी 2:00 च्या सुमारास आम्ही कार्यक्रमांचा श्रीगणेशा केला.
पुणे- नाशिक रोड वरुन गाडीने गाण्यांच्या भेंड्या सोबत वेग घेतला. वाटेत गरमागरम चहा आणि नाष्ठा घेऊन; आम्ही पुन्हा एकदा रमणीय प्रवासाला सुरुवात केली. राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, ब्राह्मणवाडा, राजूर, अकोले अशी बरीचशी छोटी मोठी गावं मागे सोडली. वातावरणात हळू हळू बदल होऊ लागला होता. अंधुक संध्याकाळ झाली होती. सूर्य मावळतीचा प्रकाश डोळ्यांना शांती प्रदान करत होता, निसर्गाने मोहून टाकणारा बदल होऊ लागला, शहरी करण आणि गाव मागे सुटली होती, त्यामुळे फक्त आणि फक्त शुद्ध, स्वच्छ, स्पष्ट आणि निर्मळ निसर्गाच खरं दर्शन होऊ लागल होत.
आता आंधार दाटून आला होता, निसर्ग आणि जंगल बोलू लागल होत. निसर्ग वेडे आणि पर्यटक यांची गर्दी वाढलेली पाहायला मिळत होती. जशी अचानकच वाऱ्याची सुखद झुळुक यावी! ज्या क्षणांन साठी आम्ही अतिशय उत्सुक आणि आतुर होतो. तसा अचानकच तो क्षण आता आला होता.
काजव्यान बद्दल थोडक्यात माहिती.
संपूर्ण सृष्टीत काही मोजकेच जीव आहेत जे स्वयं प्रकाशित आहेत. आणि काजवा हा त्यातीलच एक छोटासा कीटक! काजवे हे संपूर्ण जगभर आढळतात. त्यांचे वास्तव्य हे उष्णकटिबंध प्रदेशांत आढळतात. त्यांच्या चमकण्याचे अनेक कारणे असू शकतात. पुनरुत्पादन आणि भक्ष्य पकडणे त्यातील दोन महत्त्वाचे कारण आहे. जगभरात काजव्यांच्या 2000 पेक्षा जास्त प्रजाती संशोधकांना मिळाल्या आहेत. साधारणपणे जिथे मुबलक प्रमाणात पाणी, मोठाली वृक्षे आणि जंगल असते अशा वातावरणामध्ये काजवे आढळतात. काजवा मादी अंडी घालते. ही अंडी जमिनीमध्ये किंवा जमिनीच्या थोडे खाली लपविली जातात. तीन ते चार आठवड्यात ह्या अंड्यांमधून आळी बाहेर येते. या आळ्या म्हणजेच भविष्यातील काजवे! काजव्या मधे नर आणि मादी हे दोघेही चमकतात जे काजवे झाडांवर आणि हवेत उडताना पाहायला मिळतात ते नर काजवे असतात. आणि जमिनीवर चमकताना दिसतात ते मादी काजवे असतात.
काजव्यां मधे पोटाच्या दोन घड्यान मधे ल्युसीफेरिन नावाचे एक रसायन असते. त्यांच्या पोटाला छिद्र असतात त्यातून ऑक्सिजन आत मध्ये जातो. त्या प्राणवायूची रसायाना सोबत उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये प्रक्रिया होऊन प्रकाश उत्सर्जित होतो. हा प्रकाश मंद असल्याने थंडच असतो. अशी प्रकाश निर्माण करण्याची क्षमता फक्त प्रौढ काजवव्यांतच असते असे नाही. तर काजव्यांच्या अाळ्यांमध्ये देखील अशी रचना असते. ज्यामुळे त्या अाळ्यां देखील प्रकाशनमान होतात.
दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी पहाटे सहाच्या दरम्यान पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागे झालो. पहाटेचा उगवता सूर्य, निरभ्र आकाश, दाट जंगल, चहू बाजूंनी वेढलेल्या डोंगर रांगा, बाजूला असलेले छोटेसे तलाव ही सर्व दृश्य नजर कैदेत पडून दिवसाची सुरुवात ही अगदी भारावून टाकणारी होती. आम्ही सकाळची सर्व प्राथमिक कामे उरकून दोन किमी अंतरावर असलेल्या साम्रद गावाकडे गाडीने पोहोचणे. इथे गरमागरम चहा आणि पोह्यांचा आस्वाद घेतला. इथून अगदी थोड्याच अंतरावर असलेल्या सांदण व्हॅली कडे आम्ही पायी कूच केली. तेथे शेकडो पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. तसेच स्थानिक गावकरी व्हॅलीच्या तोंडावर असलेल्या; कड्यावर दोराच्या सहाय्याने रॅपलिंग या एडवेंचर ऍक्टिव्हिटी चे व्यवसायिक आयोजन करत असलेले दृश्य पाहायला मिळाले. हि व्हॅली तसं पाहायला गेलं तर दोन ते तीन टप्प्यांमध्ये अगदी लांबलचक आणि खोल उतरत जाते. आम्ही फक्त पहिल्या टप्प्यापर्यंत व्हॅलीच दर्शन घेतलं. कारण पुढे जाण्यासाठी सबंध दिवस त्याचबरोबर काही तांत्रिक साहित्याची आवश्यकता भासते. या व्हॅलीच दर्शन घेणे एवढाच आमचा बेत होता.
एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 कि.मी लांबवर पसरलेली आहे.पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते.कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळत. त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा. दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो. आळेफाटा-संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी (भंडारदरा)-उडदावणे-साम्रद असा रस्ता आहे. मुखाजवळच उजव्या हाताला पाणवठा आहे. नैसर्गिकपणे डोंगरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना पाषाणकडा आहे. त्याच घळीतून खाली उतरत अगदी शेवटच्या तोंडाजवळ जाता येते। त्यानंतर समोर जो काही विराट कोकणकड्याचा भाग दिसतो त्यासमोर आपण किती छोटे आहोत याची प्रचीती येते! एकदम हजार-दीडहजार फुटांचा ड्रॉप आणि समोर करुळ घाटाचा कडा आहे सांधण घळीत पावसाळ्यात काही ठिकाणी बरेच पाणी भरते त्यामुळे त्या जागा थोड्या जपूनच दोराच्या आधाराने पार करावा लागतो. तासभर या व्हॅलीच आणि आजूबाजूला असलेल्या निसर्गाच दर्शन घेऊन आम्ही पुन्हा एकदा साम्रद गावाकडे परतलो. गाडीत बसून अगदी थोड्या अंतरावर वाटेत असलेल्या; अमृतेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं. या मंदिराची थोडक्यात माहिती नमूद करण फार असाधारण बाब!
रतनगडाच्या पायथ्याशी व अमृतवाहिनी प्रवरेच्या किना-यावर अमृतेश्वराचे अप्रतिम कोरीव शिल्पकलेचा नमुना असलेले मंदिर आहे. इ.स.11व्या शतकातील एक प्राचीन मंदिर होय. चालुक्य शैलीतील हे मंदिर म्हणजे अप्रतिम शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे. सामुहिक पूजा आणि प्रार्थना करण्याच्या दृष्टीने मंदिराची रचना करण्यात आली आहे. मोठ्या वाद्याप्रमाणे मंदिराची रचना असून मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार थेट मंदिराच्या गर्भगृहातच उघडते.
मंत्रोच्चाराचा परिणाम अधिक चांगला व दीर्घकाळ टिकणारा कसा राहील याकडे मंदिराची रचना करताना विशेष लक्ष दिले गेले आहे. मंदिराच्या भिंतीवरचे कोरीव काम विविध मूर्ती, प्रवेशद्वारावरील मैथुन शिल्पे व देवदेवतांच्या कोरीव मूर्ती, छतावरील समुद्र मंथनाची दृश्ये, शिवपूजेचा देखावा, नृत्य शिल्पे, नक्षीकाम अत्यंत सुंदर व विलोभनीय आहे. 15 ते 16 मीटर उंच चुना विरहित देवदेवतांच्या कोरीव जोडकाम केलेले हे मंदिर पूर्ण दगडी असून त्याची लांबी 23 मी. व रुंदी 12 मी आहे. मंदिराच्या जवळ चौरस बांधणीची व पाय-या पाय-याची पुष्करणी आहे. कुंडाच्या कडेला 12 देवळ्या असून त्यात शेषधारी, गाधाधारी व चक्रधारी अशा भगवान विष्णूच्या मूर्ती आहेत.
वादळ वारा आणि तुफान पर्जन्यवृष्टीशी सामना करत गेल्या 800 वर्षांपासून असंख्य भाविक, कलावंत व पर्यटकांना हे मंदिर भुरळ घालत आहे.
डोळ्यात भरणाऱ्या आणि मन मोहित करून टाकणाऱ्या या मंदिराच दर्शन घेतल. आणि दोन दिवसांच्या कायमच्या सुखद आठवणी घेऊन आम्ही पुन्हा एकदा परतीच्या प्रवासास सुरुवात केली.
ठरल्या प्रमाणे थोड्या वेळेच्या प्रवासानंतर वाटेत असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. आम्ही आधीच जेवणाची ऑर्डर दिली होती. इथल्या पट्ट्यातील अतिशय सुप्रसिद्ध असलेल्या मासवडी गरमागरम जेवणावर पोटभर ताव मारला. पुन्हा एकदा गाण्यांच्या भेंड्या आणि गप्पा मारत आनंदाने पुण्यात परतलो.
आलेल्या प्रत्येक सहभागी पर्यटकांना निसर्गाबद्दल जागृतता करुन देण सय्यम आणि नियम पाळून कश्या प्रकारे जास्तीत जास्त आनंद घेता येतो. तसच निसर्गाबद्दल प्रेम, आदर, ऋण ,आभार आणि त्याचं महत्त्व पटवून देणं हा आमचा सतत प्रयत्न राहिला आहे! आणि तो कायमच राहील.
खुपच सुंदर अनुभव ... धन्यवाद
ReplyDeleteDhanyawad
Delete