Translate

Monday, January 18, 2021

निसर्गाच्या कुशीतले अंधारबन

 निसर्गाच्या कुशीतले अंधारबन 


अंधारबन पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात येतं. नावाप्रमाणेच हा ट्रेक घनदाट रानातून जातो. त्यामुळेच कदाचि या प्रदेशाला आंधरबन हे नाव पडल असाव. सह्याद्रीच्या डोंगररांगा म्हणजे भारतातल्या अति-जास्त पर्जन्यवृष्टी होणाऱ्या ठिकाणांपैकी एक. त्यामुळे या परिसरात घनदाट वृक्षराजी आढळते. ही सदाहरित वने त्यांतील वैविध्यपूर्ण जीवसंपदेसाठी प्रसिद्ध आहेत. अंधारबन चे अरण्य हे त्यातलेच एक संपन्न आणि अस्पर्शित अरण्य. पुण्याहून मुळशी डॅमहून कोकणात उतरणारा घाटरस्ता म्हणजे ताम्हिणी घाट. याच रस्त्यावरून ताम्हिणी गाव सोडलं की उजवीकडे थेट लोणावळ्याकडे जाणारा फाटा फुटतो. याच रस्त्यावर लागतं पिंप्री गाव. अंधारबनचा ट्रेक याच गावापासून सुरु होतो.पुण्यापासून साधारण ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या अंधारबन हे ताम्हिणी घाटातले घनदाट जंगल. निसर्ग पाहण्याची जणू एक पर्वणीच.अंधारबन म्हणजे काय जिथे दाट झाडी आणि अंधार असलेला ठिकाण असे हे अंधारबन. सूर्याचा प्रकाश सुद्धा झाडीच्या मधून वाट काडत आपल्यापाशी यावे असे हे जंगले आहे. अश्याच या अंधारबन चा ट्रेक हायवॉक कडून आयोजित करण्यात आलेला होता. 

 



दिनांक १० जानेवारी , रविवार सकाळी ६.३० वाजता आम्ही सगळे संभाजी बागे समोर भेटलो. ट्रेकला जायच्या अगोदर सर्वांचे फॉर्म भरून ट्रेक चा श्रीगणेशा केला. ट्रेक ला जात असताना निसर्गाचा आनंद लूटता येत होता. एका बाजूला घाट रास्ता तर एका बाजूला लांब पर्यंत नजर जाईल एवढी नदी. वाटेत जातानाचा जर रस्तयात मोर दिसला तर ? मन किती प्रसन्न होशील ना ? आमचे पण तसेच झाले. वाटेत मोरे रास्ता क्रॉस करताना दिसला आणि सगळे जन जागीच थांबले. फोटो काढण्याचा मोह कोणाला होणार नाही. सगळ्यांनी फोटो काढल्यावर आमचा प्रवास पुढे चालू झाला. मनात एकाच सारखा येत होते. आजचा दिवस खूप भारी जाणार. असा विचार चालू असताना आम्ही आमच्या ठरलेल्या हॉटेल आशीर्वाद पाशी पोचलो. गरम गरम नास्ता करून पुढचा प्रवास सुरु झाला. नास्ता नंतर काही वेळेतच आम्ही ट्रेक च्या स्टार्टींग पॉईंट ला पोचलो. ट्रेक ला जमलेल्या सगळ्या मंडळींची माहिती करून आणि आमची (HighWalk) माहिती देण्यात अली. काही जन आमच्या सोबत ३रा ते काही  पहिल्यांदा आमच्या सोबत आले होते. ह्यात विशेष म्हणजे अगदी छोटे ट्रेकर्स चा सुद्धा उत्सवाने सहभाग होता. पुन्हा एखादा निसर्गाचे नियम, अटी, यांची तोंड उजवळणी करून झालयावर, खाण्यापिन्याच्या सामानाची वाटणी करून आखिरसे ट्रेक चा श्रीगणेशा झाला. 


 

ट्रेक ला सुरवात झाली ते समोर अभेद्य असे डोंगर ठेऊन. पायवाटेने हा ट्रेक सुरु झाला. हलके हलके चढण आणि तेच उताराही. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरु सुद्धा इथे आढळतो. ट्रेकला सुरवातीस आम्हाला शेकरू पहिला मिळाले आणि सगळे खुश झाले. तसेच शंभराहून अनेक पक्ष्यांच्या प्रजाती इथे पाहायला मिळतात त्याच बरोबर दुर्मिळ वनस्पती, पक्षी, फुले इथे आढळतात. विविध वनस्पतीची माहिती देत ट्रेक पुढे चालू होता. छोटे ट्रेकर्स सुद्धा ट्रेक चा आनंद घेत चालत होते. डोक्यावर ऊन आल्या नंतर सुमारे १२.३० च्या आसपास जेवण्याची विश्रांती घेऊन पुन्हा परतीचा प्रवास सुरु झाला. विविध आकाराचे दगड एकावर एक रचवत छोटे मंडळी विश्रांतीच्या वेळेस रमून गेली होती. आम्ही आऊटडोअर एक्सपर्ट म्हणून लक्ष देणं हि मुख्य जवाबदारी असते. शेवटी सेफ्टी मुख्य आहे. 


 

म्हणतात ना THAT STARTS WELL WILL ENDS WELL, अगदी तसा हा ट्रेक झाला. हे म्हणावसं वाटलं कारण जेव्हा ट्रेक संपला आणि आम्ही गाडी पाशी आलो तेव्हा पाऊस सुरु झालेला होता. निसर्गाची पण तेव्हडीच साथ आम्हाला लाभली. सगळ्यांचे फीडबॅक फॉर्म भरून परतीचा प्रवास सुरु झाला. वाटेत दुपारचा चहा घेऊन पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला. अनेक आनंदी आठवणी उराशी घेऊन ! पुन्हा पुण्यात परतलो आणि छोट्याश्या भटकंतीचा गोड शेवट झाला. 

आयोजक म्हणून आऊटडोअर उपक्रम राबवणे हि मोठी जवाबदारी असते तसेच नियमांचे कटाक्षाने पालन करणे गरजेचं असते. आम्ही अश्या छोट्या छोट्या मोहिमांचा आयोजन करत असतो आणि आपल्या साठी आम्ही कायम हे आयोगानं करायला सधैव तत्पर आहोत.


2 comments:

  1. सर खुप छान आयोजन आहे.आम्हीसुद्धा यानंतरच्या तुमच्या रानावनातील भटकंतीच्या ट्रेकमध्ये आनंदाने सहभागी होऊ इच्छितो, जेणेकरून आत्ताच्या सिमेंट-काँक्रीटच्या जंगलात आपल्याला अनेक दुर्मिळ वृक्ष, वनस्पती व जीव यांचे प्रत्यक्ष दर्शन घडेल.

    ReplyDelete

Plus Valley Trek (Post lockdown 1st trek on 22nd Nov 20 )

  आज अनलॉक नंतर पुन्हा एकदा सुरवात करतोय आम्ही ( HighWalk). मनामध्ये एक धास्ती होती की कसे होईल याची. म्हणून आम्ही १० जणांचा ग्रुप तयार केल...