Translate

Pune Heritage Walk

भारत हा देश विविध संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा ने नटलेला देश आहे. अशा देशांमध्ये कणखर असं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य. कवी  गोविंदाग्रज  यांनी  महाराष्ट्राच्या वर्णन अगदी सुंदर केल आहे.



राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।

या महाराष्ट्रामध्ये (UNESCO)युनिसकोणी मान्यता असलेले ऐतिहासिक वारसा जसे की अजंठा-एलोरा लेणी राज्यांमध्ये आहेत. विविध संस्कृती नटलेलं हे राज्य सह्याद्रीची डोंगरान अनेक ऐतिहासिक वास्तू आणि स्वराज्यासाठी लढलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ  आणि  त्यांचे किल्ले या राज्यांमध्ये पाहायला मिळतात. 720 km ची समुद्र किनारपट्टी लाभलेला हा प्रदेश आहे. अनेक संस्कृतीक वारसा जसे की साडेचारशे वर्षांपासून चालत आलेलं पंढरपूरची यात्रा यात शेकडो भाविक आळंदी, देहूवरुन पंढरपूर पर्यंत चालत जातात.
 
 
 एवढी सगळी संस्कृती आणि प्रचंड ऐतिहासिक वारसा असून सुद्धा महाराष्ट्रात इतर राज्यांच्या सारखे पर्यटन जेवढे हवे ते तेवढे नक्कीच होत नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. याच पर्यटनाला विदेशी पर्यटकांसमोर आणण्यासाठी हायवॉक ने खारीचा वाटा उचलला आहे. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या अद्वितीय विलोभनीय जागा दाखवण्याचे काम हायवॉक करते.
 

 
 
पुणे तिथे काय उणे हे अगदी खरे आहे. आज पुण्यामध्ये काय नाही अगदी प्राचीन वारसा पासून हे आत्ताच आयटी हब पर्यंत सर्वकाही पुण्यामध्ये आहे. पुण्याच्या आयटी हबच्या जवळपास सुद्धा अनेक असे ऐतिहासिक  वारसा आहे जिथे आजचे आयटी इंजिनियर हायवॉक सोबत जाऊन पाहू शकतात. मगरपट्टा च्या जवळ असलेलं आगाखान पॅलेस, शिंद्यांची छत्री, असे अनेक स्थळ  आहेत. हिंजवडी च्या जवळचं पाषाण इथले  सोमेश्वर वाडी मध्ये  सोमेश्वराचे मंदिर जे सुमारे 900 वर्षापूर्वीचे मंदिर आहे. हे मंदिर यादवकालीन असून  याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. पुणे हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे, ज्याची सुरुवात अगदी पुण्याच्या ऐतिहासिक नावापासून सुरुवात केली तर वावगे ठरणार नाही. पुण्याला अनेक नावांनी ओळखले जायचे त्यातले काही नावं आजही बराच वेळा घेतले जातात जसे की पुण्यनगरी आणि पुनवडी. पुण्यामध्ये परदेशी पर्यटकांची येणं जाणं असतं. त्यातले काहीजण पर्यटक म्हणून येतात, कामानिमित्त येतात तर काहीजण पुण्याची संस्कृती आणि वारसा याचा अभ्यास करण्यासाठी येतात. 
 

 
 
अशा सर्व परदेशी पर्यटकांसाठी हायवॉक ऐतिहासिक सहल म्हणजे हिस्टॉरिकल टूर ऑर्गनाईज करते. पर्यटकांना कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पुण्यातील ठिकाणे पाहता यावे किंवा जास्तीत जास्त अभ्यास करता यावा या साठी  हायवॉक कस्टमआईस टूर करून देते ते ही त्यांची वेळ आणि आवड  पाहून, ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आमची आहे किंवा छंद आहे. किमान तीन दिवसाची  टूर  केल्यानंतर  हा इतिहास  नीट समजून घेता येतो. आमच्या मते पुणे हे असे शहर आहे जिथे सर्व प्रकारची खाद्यसंस्कृती अनुभवता येते. यात अस्सल पुणेरी जेवणापासून  खानदेशी, वराडी  ते अगदी  दक्षिणात्य  इडली डोसा त्याच बरोबर पंजाबी पासून राजस्थानी पर्यंत ते अगदी बंगाली पर्यंत सगळे पदार्थ यांची ओळख करून आम्ही देतो. पुणे शहराची काही परंपरा आहे जिथे पुण्यातील खाद्यपदार्थ  देश-विदेशात  सुद्धा पाठवले जातात यातील एक म्हणजे  चितळ्यांची बाकरवडी. ही बाकरवडी  बहुतांशी पर्यटकांना आकर्षित करणारी असते आम्ही त्याचा आस्वाद चा आनंद पुरेपूर घेऊन देतो. पर्यटकांची मनाची प्रसन्नता  ही आमची  मोठी  पोचपावती  असते.
 
 

पुण्याला ज्याप्रमाणे संस्कृतिक वारसा आहे त्याचप्रमाणे भक्ती वारसा सुद्धा लाभलेला आहे. पुण्यातील गणेशोत्सव हे जगभरात प्रसिद्ध आहे. हेच गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक पुण्यामध्ये येतात. याच काळात पर्यटकांना विविध गणेशाचे मंदिरांना भेट देण्याची मागणी असते त्यात मानाचे पाच गणपती बरोबर ,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांचेही दर्शन घेतले जाते. या काळातही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विशेष दर्शन पूजा व आराधना करून घेण्यात येते. हा अनुभव त्यांच्यासाठी एक विलक्षण असा अनुभव असतो. पुण्यातला सगळ्यात श्रीमंत आणि प्रसिद्ध असलेला अगदी समुद्रापार सुद्धा या गणपतीची ख्याती असलेला हा गणपती आहे. सन 1893 मध्ये  श्रीमंत दगडूशेठ हलवाई या काळातले सुप्रसिद्ध मिठाईवाले होते. ज्यांच्या नावाने हा गणपती ओळखला जातो. त्याकाळी या गणपतीची मूर्ती बनवण्याचा खर्च रुपये 1125/- इतका आला. पुण्याची शान असलेली पुणेरी पगडी आणि शैल्य हे परदेशी पर्यटकांसाठी एक शॉपिंगची पर्वणी ठरते. ही पुणेरी पगडी परदेशी पर्यटकांना सदैव पुण्याची आठवण करून देत राहते. परदेशी महिला पर्यटकांसाठी तुळशीबाग हेच एक आकर्षण नक्की असते. लोकल मार्केट मधून काहीतरी खरेदी करणे हे त्यांना विशेष आवडते. 
 
 
 
खरेदी करून झाल्यानंतर तुळशीबाग मध्ये असलेले श्रीराम मंदिर म्हणजेच तुळशीबाग राम मंदिर हेसुद्धा या वॉक मध्ये दाखवले जाते. तुळशीबाग राम मंदिर  हे पुण्यातील  पेशवेकालीन  राम मंदिर आहे ,जे पुण्यातील  बुधवार पेठ  या भागात आहे. हे मंदिर आणि तुळशीबाग  श्रीमंत नारो आप्पाजी हिरे  ( तुळशीबागवाले ) यांनी ह्याची ची स्थापना केली . तुळशीबाग राम मंदिराचे बांधकाम इ.स.1761 ला सुरू झाले आणि 1795 पर्यंत चालू राहिले. अशा विलोभनीय मंदिरा ची भेट पर्यटकांची नक्कीच हायवॉक करून आणते. या सगळ्याचे वर्णन करताना आमची शब्द अपुरे पडतात. आमच्या सोबत परदेशी पर्यटक फिरल्यानंतर सुद्धा नंतर नवीन वस्तू पाहण्यासाठी येऊ असं सांगून आमच्या प्रेमात पडून आमचा अलविदा घेतात. हायवॉक कडून टूर ची समाप्ती झाल्यावर त्यांना एक मेमोरी म्हणून सोविनियर सुद्धा दिली जाते.
 
 
 
आमची यातली विशिष्ट म्हणजे आपलेपणा,जिवाळा आणि सुरक्षा ही हायवॉक ची अधोरेखित करण्याची गोष्टी आहेत. अशा सर्व सुखद अनुभव मनामध्ये साठवल्या नंतर परदेशी पर्यटक मायदेशी रवाना होतात. आत्तापर्यंत आम्ही युएस, टॅक्सेस, न्यूयॉर्क अशा देशांमधील पर्यटकांना पुण्याचं ऐतिहासिक सहल घडवून आणलेली आहे. आम्हाला आज आनंद आहे की हे परदेशी पर्यटक आपल्या मायदेशी गेल्यानंतर त्यांचे मित्रमंडळी नातेवाईक यांना आमचा कनेक्ट सांगून आम्हाला भारतामध्ये आल्यावर भेटायला सांगतात अशा माऊथ पब्लिसिटी ने परदेशी पर्यटकांना आम्ही हे ऐतिहासिक पुणे शहर दाखवू शकलो आणि पुढे दाखवत राहू.

No comments:

Post a Comment

Plus Valley Trek (Post lockdown 1st trek on 22nd Nov 20 )

  आज अनलॉक नंतर पुन्हा एकदा सुरवात करतोय आम्ही ( HighWalk). मनामध्ये एक धास्ती होती की कसे होईल याची. म्हणून आम्ही १० जणांचा ग्रुप तयार केल...