निसर्गरम्य ताम्हिणी घाट
ताम्हिणी म्हटलं तर निसर्ग वेडे आणि हौशी भटक्यांची पंढरी पुण्यापासून अगदी जवळ म्हणजे तास दिड तासाच्या अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. हल्लीच म्हणजे गेल्या सात आठ वर्षापूर्वीच 2013 या वर्षी ताम्हिणी पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसच 150 हून अधिक विविध पक्षांच्या जाती इथे आढळतात, त्याचबरोबर 72 फुलपाखरांच्या प्रजाती आहेत, 18 प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जाती आहेत, तसेच काही विशिष्ठ जातीची दुर्मीळ वनस्पती सुद्धा आहेत. आणखी बरेच काही जैवविविधतेचे प्रकार इथे पाहायला मिळतात. पण माझ्या ज्ञानभांडारत इतकंच काय ते माहिती.
पुणेकरांसाठी ताम्हिणी घाट एखाद्या कृतज्ञ वरदाना प्रमाणे आणि एखाद्या मेजवानी पेक्षा कमी नाही.
इथल्या विविधतेने नटलेल्या निसर्गरम्य वातावणात सहज हरवायला होत. पावसाळ्यात इथला निसर्ग जुने कपडे उतरवून नवीन कपडे परिधान करतो. एखाद्या मोठ्या सणाची जंगी तयारी म्हणून स्वतःलाच विविध आभूषणांनी नटवून घेतो. इथला निसर्ग परिसर आपल्या जिवंतपणाची जाणीव करून देतो. खळखळणारे ओढे, प्रचंड आवाज करत कोसळणारे शेकडो धबधबे, पानं-फुलं, डौलदार झाडे-झुडपे, विविध रंगांनी नटलेल्या वनस्पती, हिरव्यागार रंगाने आच्छादलेले डोंगर, जंगल आणि दऱ्याखोऱ्यात दूरदूरवर पसरलेल शुभ्र मखमली धुकं, हिरव्यागार गालिचाने व्यापलेल रानमाळ, धडकी बसणारी आभाळ गर्जना, सतत लुकलुकणार्या विजांचा प्रकाश झोत, एक विशिष्ट आणि जोरदार आवाज करत चिडलेल्या स्वरात सतत धोधो कोसळणारा पाऊस, नर्डी फोडून डरावक्या करणारी बेडकं, विविध प्रकारे आवाज करणारे अनेक पशु किटक, अश्या सगळ्याच जैवविविधतेचे अनुभव आपणास येथे अनुभवण्यास मिळतात. इथल्या निसर्गाच वर्णन आणि अनुभवलेखन करण फारच कमी आणि अपूर वाटतं शब्द अपुरे आणि फिके वाटू लागतात. असो

आम्ही येत्या रविवारी 21 जुलै 2019 रोजी ताम्हिणी घाटातील ट्रेक व ट्रेल अश्या वेगळ्या आणि मिश्र स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रत्येक वयोगटातील नागरिकांना या मोहिमेमध्ये सहभागी होऊन पुरेपूर आनंद घेता यावा हे या आयोजनाच उद्दिष्ट. शारीरिक दृष्ट्या बेसिक फिटनेस आणि मेडिकल समस्या नसणारे असन, एवढीच काय ती या मागची अट.
रविवारचा तो दिवस उजाडला! ठरलेल ठिकाण पुण्यातील संभाजी उद्यानासमोर सकाळची 6:30 वाजता. Highwalk टीम लीडर्स आणि सहभागी सदस्य एकत्र जमलो. काही नियम, अटी आणि सूचना सत्र आटपून निघेपर्यंत 7:00 वाजले. आणि अखेरीस आम्ही सर्वजण बसमध्ये बसून गणरायाच्या जय घोषाने या मोहिमेची सुरुवात केली. अर्ध्या पाऊण तासाच्या प्रवासनंतर पिरंगुट जवळ असलेल्या श्रीपाद हॉटेल मध्ये गरमा-गरम चहा आणि नाष्ट्याचा आस्वाद घेऊन पुन्हा पुढल्या प्रवसाला सुरुवात केली. जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या पावसाने जोर पकडल्यानंतर गेली कित्येक दिवस होऊन गेले होते. पावसाने मात्र लांबलचक सुट्टीच घेतली होती. ऐन जुलै महिन्याचा तिसऱ्या आठवडा उजाडला मात्र तरीही पावसाचा काही ठाव ठिकाणा लागेना. पुण्यात जरी पाऊस नसला तरी आपल्याला ताम्हिणी घाटात थोड्या प्रमाणात का होईना! नक्कीच पाऊस मिळेल अशी आशा होती. आमच्या पासून पाऊस वंचीत राहण्याच्या निराशा करणारी चिंता मनाला भेडसावत होती. आणि झाल ही तसच शेवट पर्यंत पावसाने काही दर्शन दिल नाही, असो निसर्ग नियमांपुढे आपण ठेगनेच.
काही वेळातच मुळशी धरणाजवळ पोचलो. वळणा वळणाचा गाडी रस्ता सुरु झाला. वळणा सोबत गाडी ही थोडी मंदावली होती. डोळ्यांना सुखावणारा पाण्याचा स्पर्श पापण्यांच्या कवेत पसरला होता. निसर्ग धरणाच्या काठोकाठ, बांधा-बांधावर आपल रूप बदलत होता. आभाळातून ऊन सावलीचा खेळ सुरु होता. आधुन-मधून सूर्याची किरणं विस्तारलेल्या ढगांमधून डोकं काढून बाहेर डोकावत होती. पाऊस नसला म्हणून काय झाल. निसर्गाचा मात्र आपला मन मोहून टाकणारा बहुरुपी खेळ सुरु होता. निसर्गसौंदर्याने नटलेल्या निसर्गाची सफारी करत. काही वेळातच रमणीय प्रवास करत आम्ही आमच्या ट्रेक सुरु होण्याच्या गावठानी कधी पोचलो हे कळलच नाही. आमचा हा ट्रेक एका गावाच्या बाजूने सुरु होऊन दुसऱ्या टोकाकडील गावाच्या ठिकाणी संपणार होता.
या गावांची नाव मला गुपितच ठेवाविशी वाटतात. इथली शांतता हरवू नये एवढचं या मागच उद्दिष्ट. 🙏म्हणून गाडी चालकाला योग्य माहिती देवून दुसऱ्या गावाकडे पोचून आमची वाट पाहण्याची सूचना दिली. ट्रेकला जमलेल्या मंडळींना आम्ही आमची ( highwalk) ची माहिती करुन दिली त्याच बरोबर एकमेकांची माहीती सुद्धा घेतली. काही कसलेले भटके तर काही अगदीच नवखेे; तर काहींची पहिलीच वेळ! अशी एकमेकांची ओळख पटली. पुन्हा एकदा निसर्ग नियम, अटी यांची तोंड उजळणी करून झाल्यावर; सुरवतीला काही टीम (फन) गेम खेळून. खाण्यापिण्याच्या सामानाची वाटणी केली आणि अखेरीस ट्रेकचा श्री गणेशा केला.
जंगल, ओढे, धब-ढबे, वाढलेलं गवत, तुडवत पुढे निघालो. ढग-ऊन आजुबाजुचे जंगल, डोंगरावरील हिरवे गार गालिछे, खळखळ वाहनारे पानवटे त्यातून तोल सांभाळत पुढे सरकत जाण यातील मजा काही वेगळीच.
या भटकंतीतील पायपीट अनुभव थोडा निराळाच; यात कोणत्या ही प्रकाचा तीव्र (खूप) चढ म्हणाव तसा नाहीच. जवळपास 90% टक्के सरळ आणि जवळपास सपाट पायवाट रस्ता आणि शेवटचा 10% टक्के हा फक्त उतरणीचा टप्पा अस ह्या भटकंतीच विशेषण. ह्या ट्रेक मध्ये सुरुवातीलाच काही अंतर पार केल्यावर पहिला मोठा ओढा पार करावा लागतो. एका मागून एक काही अंतर पार करत जवळपास 6 ते 7 छोटे मोठे ओढे पार करुन जाव लागत. अतिवृष्टी मुळे इथल्या ओढ्यांना प्रचंड, वेगाने जोर चढतो. त्याच रुपांतर खरतर नदी पात्रा प्रमाणे झाल्यासारख पाहायला मिळत. त्यामुळे बऱ्याचदा हे ओढे पार करताना आम्हाला सुरक्षिततेची बाब म्हणून नेहमी दोर (रोप) चा वापर करावा लागतो. पावसाच्या अभावी या वेळी तशी गरज मात्र भासलीच नाही. पाऊस आजीबाताच न्हवता पण तरी ओढे, नाले, आणि धबधब्यांची आमच्या जवळ कमतरता न्हवती. त्यामुळे आलेले सर्व सहभागी मंडळी ठीक-ठिकाणी पाण्यात चिंब-डुंबून मनमुराद आनंद लुटत होते. हा ट्रेक मी लीड करत होतो. त्यामुळे लोकांना आवर घालणं आणि प्रेमाने वार्ता करत पुढे जायला प्रवृत्त करने तसच अधून मधून थोड संयम बाळगून प्रत्येकाचे मन जपणं थोड कठीणच. पण कामाचा एक भागच बराच वेळ ओढ्यांच्या मिठीत खेळू सुरु होता. लोक पाण्याच्या इतक्या मोहात पडले होते की पाण्याच्या बाहेर येण्यासाठी शेवटी विनंती, विनवण्या कराव्या लागत होत्या. तसा नवीन ओढा आला रे आला की आमची थोडी तारांबळ उडायची. आता परत पाण्याने तुडुंब भरुन वाहणाऱ्या ओढ्याच्या मोहापासून लोकांना परावृत्त करण अतिशय महाकठीण काम ही थोडी गमतीची बाब असली तरी आमच्या कामातील सवयीचाच एक भाग. आमचा ट्रेक अतिशय संथगतीने सुरु होता कसली घाई नाही, चिंता नाही, वेळेच फारस बंधन नाही, का कोणाची रोकटोक नाही, त्याहून महत्त्वाचं म्हणजे आम्ही सोडून दुसऱ्या कोणत्याही पर्यटकांची गर्दी किंवा रेलचेल नाही, कारणच तस होत बिन गर्दीच्या ठिकाणाची निवड.

जवळ पास एका मागून एक आम्ही सर्व ओढे, पानोटे, आजूबाजूला डोंगर आणि जंगलाने वेढलेला काही भाग मागे सोडून एकमेव असलेला चढ चढाई करून. शेवटी दुसऱ्या टोकाला असलेल्या डोंगर माथा गाठला. या माथ्यावरून संपूर्ण कोकण दर्शन घडत. इथून रायगड, निजामपूर, कोलाड, माणगाव, भिरा टाटा विद्युत प्रकल्प तलाव, व्हाईट रिवर राफ्टींगचा पट्टा, पाली , सुधागड, सरसगड, लोणावल्याकडील काही भाग कोरीगड, घनगड, तैलबैला, आंबे व्हॅली, कुंडलिक व्हॅली, प्लस व्हॅली तसेच आजूबाजूची शेकडो गावे, जंगल, छोटे मोठे तलाव, शेकडो एकर शेत जमिनी, माळरान, औद्योगिक क्षेत्र परिसर अस बरच काही या माथ्यावरून दृष्टीस पडत. त्यामुळे हा सगळा भव्य परिसर डोळ्यात भरून मनाला आश्चर्यचकित करतो. घडलंही तसंच आलेल्या प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित भावना आणि कौतुकाचे उद्गार फुटत होते. जवळपास अर्धा तास या पठाराच्या धारेवर सुखद वेळ घालवला, शेकडो छायाचित्रे टिपली गेली. या संपूर्ण परिसराची माहिती देण्यात आली आणि अखेरीस शेवटचा टप्पा उतरण्यास सुरुवात झाली. एका बाजूला कडा आणि दुसऱ्या बाजूला दरी असा ह्या उतरणीचा प्रकार; हा टप्पा तीव्र उतरणीचा आणि काहीसा किचकट स्वरूपाचा असल्यामुळे, आम्ही सावकाश आणि सावध पणे उतरत होतो. इथून घाटरस्ता अगदी सहज नजरेत भरतो तसच धावणाऱ्या वाहनांची रेलचेल अगदी सहज पाहायला मिळते. काही ठिकाणी ठिसूळ दगड-माती तर काही ठिकाणी पायाखाली भक्कम मोठाले खडक, तर कुठ निसरड शेवाळ, तर काही ठिकाणी आधाराला कारवीची झाड काही ठिकाणी तर अगदी बसून सरपटत उतराव लागत होत.
एकमेकांची मदत करत आवघड स्वरूपाचा पण मनोरंजक असा टप्पा सुखरूप रित्या पार पाडला; आणि टाळ्या वाजवून एकमेकांचे स्वागत करुन अभिनंदन केले. प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर आनंद आणि समाधान उमटल होत. खरच खूप मजा आली होती, आयोजक म्हणून आमच्या पाठीवर ही कौतुकाची थाप पडली होती. त्यामुळे मनाला अलौकिक समाधान वाटत होत.

आमच्या टीम मध्ये संदीप चव्हाण, शैलेश महाशब्दे, सैफ आणि मी असे चारजण होतो. सर्वजण एकत्र जमून थोडा वेळ स्ट्रेचिंग केल. तोवर गाडी चालक गाडी घेऊन तयारच होता. आयोजक या नात्याने आम्ही सर्वांना शुभेच्छा दिल्या सर्वांचे आभार मानले. जिथे ट्रेक संपतो त्याच ठिकाणी देवीच मंदिर ही आहे. आम्ही सर्वांनी देवीच दर्शन घेतल आणि निसर्गाचे आभार मानत शेवट गोड करुन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
आता भूक ही प्रचंड लागली होती. मुळशी गावात आधीच जेवणाची ऑर्डर ही दिली होती. तासभर प्रवास करुन मुळशी गाठल. पोठभर गरमागरम जेवण करून पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला लागलो. अनेक आनंदी आठवणी उराशी घेऊन! पुन्हा पुण्यात परतलो आणि छोट्याश्या भटकंती सहलीचा गोड शेवट केला. ☺
आयोजक म्हणून आऊटडोअर उपक्रम राबवण ही अतिशय मोठी जबाबदारी असते. म्हणूनच प्रत्येक आयोजकांनी नियमांचे कटाक्षाने पालन करण अनिवार्य आहे. छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्हाला बारकाव्याने लक्ष द्याव लागत. हे अनुभवातूनच आकलन होत रहात. कधी कधी विपरीत परिस्थितीला सामोर जावलागत, निसर्गातील परिस्थितीचा आढावा घ्यावा लागतो. आपण ज्या ठिकाणी भेट देणार आहोत तिथल्या भौगोलिक, ऐतिहासिक, प्रादेशिक, सांस्कृतिक आणि ईतर गोष्टीन बद्दल थोडक्यात माहिती असायला हवी. तसेच धोक्याच्या बाबी लक्षात घ्यायला हव्या. आणीबाणी (emergency) योजना असायला हवी. आपण स्वतः नियमांचे पालन तर केले पाहिजेच, पण आलेल्या सहभागी लोकांना सुद्धा याचे तंतोतंत पालन करण्यास जागरुक करायला हव. या सगळ्या बाबी लक्षात घेता सहभागी मंडळींनी सुद्धा आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. आपण सुरक्षित हातात आहोत ना ? याची पूर्णपणे खात्री करावी आणि मगच अश्या आयोजित मोहीमान मध्ये सहभागी व्हाव. त्यामुळे तुम्ही स्वतः जागृत तर होताच पण त्याच बरोबरच इतरांनाही जागृत बनवू शकता. आऊटोअर मध्ये विविध स्वरूपाची भटकंती हा एक अनुभव आहे, ज्ञान आहे, शिक्षण आहे, यश आहे. आणि अश्या विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या मोहिमांसाठी आम्ही सतत आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत.
🙏
लेखन :-
High walk कडून
अजय मोरे
High walk कडून
अजय मोरे
No comments:
Post a Comment