Translate

Monday, January 18, 2021

निसर्गाच्या कुशीतले अंधारबन

 निसर्गाच्या कुशीतले अंधारबन 


अंधारबन पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात येतं. नावाप्रमाणेच हा ट्रेक घनदाट रानातून जातो. त्यामुळेच कदाचि या प्रदेशाला आंधरबन हे नाव पडल असाव. सह्याद्रीच्या डोंगररांगा म्हणजे भारतातल्या अति-जास्त पर्जन्यवृष्टी होणाऱ्या ठिकाणांपैकी एक. त्यामुळे या परिसरात घनदाट वृक्षराजी आढळते. ही सदाहरित वने त्यांतील वैविध्यपूर्ण जीवसंपदेसाठी प्रसिद्ध आहेत. अंधारबन चे अरण्य हे त्यातलेच एक संपन्न आणि अस्पर्शित अरण्य. पुण्याहून मुळशी डॅमहून कोकणात उतरणारा घाटरस्ता म्हणजे ताम्हिणी घाट. याच रस्त्यावरून ताम्हिणी गाव सोडलं की उजवीकडे थेट लोणावळ्याकडे जाणारा फाटा फुटतो. याच रस्त्यावर लागतं पिंप्री गाव. अंधारबनचा ट्रेक याच गावापासून सुरु होतो.पुण्यापासून साधारण ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या अंधारबन हे ताम्हिणी घाटातले घनदाट जंगल. निसर्ग पाहण्याची जणू एक पर्वणीच.अंधारबन म्हणजे काय जिथे दाट झाडी आणि अंधार असलेला ठिकाण असे हे अंधारबन. सूर्याचा प्रकाश सुद्धा झाडीच्या मधून वाट काडत आपल्यापाशी यावे असे हे जंगले आहे. अश्याच या अंधारबन चा ट्रेक हायवॉक कडून आयोजित करण्यात आलेला होता. 

 



दिनांक १० जानेवारी , रविवार सकाळी ६.३० वाजता आम्ही सगळे संभाजी बागे समोर भेटलो. ट्रेकला जायच्या अगोदर सर्वांचे फॉर्म भरून ट्रेक चा श्रीगणेशा केला. ट्रेक ला जात असताना निसर्गाचा आनंद लूटता येत होता. एका बाजूला घाट रास्ता तर एका बाजूला लांब पर्यंत नजर जाईल एवढी नदी. वाटेत जातानाचा जर रस्तयात मोर दिसला तर ? मन किती प्रसन्न होशील ना ? आमचे पण तसेच झाले. वाटेत मोरे रास्ता क्रॉस करताना दिसला आणि सगळे जन जागीच थांबले. फोटो काढण्याचा मोह कोणाला होणार नाही. सगळ्यांनी फोटो काढल्यावर आमचा प्रवास पुढे चालू झाला. मनात एकाच सारखा येत होते. आजचा दिवस खूप भारी जाणार. असा विचार चालू असताना आम्ही आमच्या ठरलेल्या हॉटेल आशीर्वाद पाशी पोचलो. गरम गरम नास्ता करून पुढचा प्रवास सुरु झाला. नास्ता नंतर काही वेळेतच आम्ही ट्रेक च्या स्टार्टींग पॉईंट ला पोचलो. ट्रेक ला जमलेल्या सगळ्या मंडळींची माहिती करून आणि आमची (HighWalk) माहिती देण्यात अली. काही जन आमच्या सोबत ३रा ते काही  पहिल्यांदा आमच्या सोबत आले होते. ह्यात विशेष म्हणजे अगदी छोटे ट्रेकर्स चा सुद्धा उत्सवाने सहभाग होता. पुन्हा एखादा निसर्गाचे नियम, अटी, यांची तोंड उजवळणी करून झालयावर, खाण्यापिन्याच्या सामानाची वाटणी करून आखिरसे ट्रेक चा श्रीगणेशा झाला. 


 

ट्रेक ला सुरवात झाली ते समोर अभेद्य असे डोंगर ठेऊन. पायवाटेने हा ट्रेक सुरु झाला. हलके हलके चढण आणि तेच उताराही. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरु सुद्धा इथे आढळतो. ट्रेकला सुरवातीस आम्हाला शेकरू पहिला मिळाले आणि सगळे खुश झाले. तसेच शंभराहून अनेक पक्ष्यांच्या प्रजाती इथे पाहायला मिळतात त्याच बरोबर दुर्मिळ वनस्पती, पक्षी, फुले इथे आढळतात. विविध वनस्पतीची माहिती देत ट्रेक पुढे चालू होता. छोटे ट्रेकर्स सुद्धा ट्रेक चा आनंद घेत चालत होते. डोक्यावर ऊन आल्या नंतर सुमारे १२.३० च्या आसपास जेवण्याची विश्रांती घेऊन पुन्हा परतीचा प्रवास सुरु झाला. विविध आकाराचे दगड एकावर एक रचवत छोटे मंडळी विश्रांतीच्या वेळेस रमून गेली होती. आम्ही आऊटडोअर एक्सपर्ट म्हणून लक्ष देणं हि मुख्य जवाबदारी असते. शेवटी सेफ्टी मुख्य आहे. 


 

म्हणतात ना THAT STARTS WELL WILL ENDS WELL, अगदी तसा हा ट्रेक झाला. हे म्हणावसं वाटलं कारण जेव्हा ट्रेक संपला आणि आम्ही गाडी पाशी आलो तेव्हा पाऊस सुरु झालेला होता. निसर्गाची पण तेव्हडीच साथ आम्हाला लाभली. सगळ्यांचे फीडबॅक फॉर्म भरून परतीचा प्रवास सुरु झाला. वाटेत दुपारचा चहा घेऊन पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला. अनेक आनंदी आठवणी उराशी घेऊन ! पुन्हा पुण्यात परतलो आणि छोट्याश्या भटकंतीचा गोड शेवट झाला. 

आयोजक म्हणून आऊटडोअर उपक्रम राबवणे हि मोठी जवाबदारी असते तसेच नियमांचे कटाक्षाने पालन करणे गरजेचं असते. आम्ही अश्या छोट्या छोट्या मोहिमांचा आयोजन करत असतो आणि आपल्या साठी आम्ही कायम हे आयोगानं करायला सधैव तत्पर आहोत.


Monday, December 28, 2020

Plus Valley Trek (Post lockdown 1st trek on 22nd Nov 20 )

 
आज अनलॉक नंतर पुन्हा एकदा सुरवात करतोय आम्ही ( HighWalk). मनामध्ये एक धास्ती होती की कसे होईल याची. म्हणून आम्ही १० जणांचा ग्रुप तयार केला आणि जायचं  ठरवलं. ह्यात आम्हाला लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला पण आम्हाला ही  काळजी होती की ग्रुप  पण मोठा न्यायचा नाहीये आणि सर्व नियम व अटी पाळून हा ट्रेक करायचा आहे. म्हणून आम्ही १० जणांचा ग्रुप घेऊन गेलो. ट्रेक सुरु करण्याआधी आयोजकाला बऱ्याच बारीक बारीक गोष्टींवर लक्ष द्यावे  लागते  जसे की नाश्ता व जेवण कुठे द्यायचे.सोशल डिस्टंसिन्ग  कसे ठेवता येईल, फूड क्वालिटी कशी असेल, इत्यादी. कोविड मुळे आम्ही  पॅकेट फूड द्यायचं ठरवलं  आणि तेही हायजेनिक असेल याकडे  जास्त लक्ष देण्यात आले. यात आयोजकांचा कस लागला. ही सगळी तयारी करून हायवॉक ने ठरल्या दिवशी ट्रेक नेण्याचे ठरविले. 
 
 
अखेर तो दिवस आला ! सकाळी ६.३० ला आम्ही चांदणी चौकात भेटायचे ठरविले . प्रत्येकजण आपापल्या गाडीने तिथे आले. पूर्वेच्या दिशेला मस्त लालसर आकाश दिसत होते,गुलाबी थंडीचे दिवस असल्याने प्रसन्न वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट हे सगळं छान अनुभवता आले. लॉकडाऊन मध्ये पुण्यातील वायुप्रदूषण कमी झाल्यामुळे हे सुंदर असं वातावरण दिसू लागल होत. ह्यात पक्ष्याच्या आवाजामुळे तयार झालेलं  नवचैतन्य घेऊन सर्वांचे फॉर्म भरून आम्ही पुढे जायला निघालो. निघताना निसर्गाची किमया डोळ्यात साठवत प्रवास सुरु होता. वळणावळणाचे रस्ते, निळेशार पाणी तर एका बाजूला हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या  छटा दर्शवणाऱ्या  निसर्गाला पाहून थक्क व्हायला झालं. काही वेळातच मुळशी मध्ये  असलेल्या हॉटेल आशीर्वाद मध्ये आम्ही पोचलो आणि नाश्ता  केला. गरम गरम चहा नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. रस्त्यामध्ये दिसणारी प्लस व्हॅली  च्या इथे थांबून मंडळींना व्हॅली कशी दिसते  आणि कुठे जाणार आहोत ह्याची कल्पना देऊन ठरवलेल्या ठिकाणी जाण्याकरता पुढचा प्रवास सुरु झाला. काही वेळातच आम्ही सर्व ठरवलेल्या ठिकाणी पोहचून गाड्या पार्क करून सगळे एकत्रित जमलो. ह्यावेळेस मात्र आम्ही नेहमीसारखा  ट्रान्सपोर्ट दिला नव्हता तेही कोविडच्या सावधगिरीमुळे . म्हणून मंडळींना स्वतःच्या गाडीने यायला सांगितले होते. ट्रेक ला जमलेल्या सर्व मंडळींना आमची ( HighWalk) ची माहिती करून दिली व त्याचबरोबर एकमेकांची माहिती सुद्धा घेतली. काही अनुभवी भटकंती करणारे  तर काही अगदी नवखे तर काहींची पहिलीच वेळ होती! अशी एकमेकांची ओळख पटली. पुन्हा एकदा  निसर्गाचे नियम व अटी  यांची तोंड उजळणी करून झाल्यावर, खाण्यापिण्याच्या सामानाची वाटणी करून अखेरीस ट्रेकचा श्रीगणेशा केला. 
 
 
 
ट्रेक ला सुरवात झाली आणि दाट झाडी, खळखळणारा पाण्याचा आवाज ह्याने मन प्रसन्न होत होते. पक्ष्यांचा किलबिलाट हिरवीगार झाडी यातून  मार्ग काढताना एक्सपर्टस  कडून झाडांची माहिती, दिसणारे पक्षी, फुलं, आणि या सगळ्याची माहिती ऐकत सगळी  मंडळी खाली उतरत होती.  शांत निसर्गाची सगळेजण अनुभूती घेत खालीउतरणे  चालू होते. ट्रेक चालू असताना मध्येच  एका झाडाच्या इथे  एक मोठा कोळी (स्पायडर) पाहून सगळे थांबले. असे अनेक किटक ह्या जंगलात आहेत व त्याची माहिती सांगून पुढे कुंडाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. काही वेळातच डोक्यावर ऊन असताना आम्ही कुंडापाशी पोहचून जरा वेळ आराम केला. डोक्यावर ऊन असल्यामुळे काहींनी नदीचे शुद्ध पाणी प्यायले तर काहींनी पाण्यात पोहण्याचा आनंदही लुटला. काही निसर्गाची किमया पाहण्यात दंग झाले होते.पक्ष्यांचे विविध आवाज हे मानवाला एक प्रकारची  म्युझिक थेरपी आहे. मनावरचा ताण-तणाव या थेरपी ने एकदम कमी व्हायला मदत होते पण त्याच बरोबर मन सुद्धा रिफ्रेश करून टाकते. 
 
 
नदी तीन कुंडातून वाहून खाली देवकुंडात जाते. ह्याच नदीचे नाव म्हणजे कुंडलिका नदी जी ह्या व्हॅलीतुन उगम पावते. दुपारचे  दिलेले  पॅक फूड खाल्ल्यानंतर परतीचा प्रवास सुरु झाला. सगळ्यांनी व्हॅलीला धन्यवाद देऊन आम्ही परत यायला निघालो. जाताना उतार होता तर येताना तेवढेच चढणं ही होते. साधारण परत मधल्या मोकळ्या जागेपर्यंत येऊन आम्ही जरा विश्रांती घेतली. सगळ्यांनी आपापले अनुभव मांडले. काहींचा पहिला ट्रेक होता तर काहींचे  आमच्या सोबत दुसरा  किंवा तिसरा  ट्रेक होता. सेफ्टी, पुरेसे  अन्न, हायजिन, सेल्फ डिस्टंसिन्ग ह्या सगळ्यांचे पालन  केल्यामुळे सगळे खुश होते. परत आम्ही तुमच्या ( HighWalk) सोबत नक्की येऊ असे आश्वासन देऊन सर्व मंडळी पार्क केलेल्या जागी अली. सगळ्यांचे फीडबॅक फॉर्म भरून परतीचा प्रवास सुरु झाला. अनेक आनंदी आठवणी उराशी घेऊन ! पुन्हा पुण्यात परतलो आणि छोट्याश्या भटकंतीचा गोड शेवट केला. 
 
 
आयोजकांचे आऊटडोअर उपक्रम राबविणे ही अतिशय मोठी जबाबदारी असते. म्हणून प्रत्येक आयोजकांनी नियमाचे कटाक्षाने पालन करणे अनिवार्य आहे. हे अनुभवातूनच  शिकायला मिळते. आपण ज्या ठिकाणी भेट देणार आहोत तिथल्या भौगोलिक, ऐतिहासिक, प्रादेशिक, सांस्कृतिक आणि इतर गोष्टींबद्दल थोडक्यात माहिती असायला हवी. आणीबाणीची (Emergency) ची योजना असायला हवी. आपण स्वतः जर जागरुक राहिलो तर इतरांना पण जागरुक बनवू शकतो. आऊटडोअर मध्ये विविध स्वरूपाची भटकंती हा एक अनुभव आहे, ज्ञान आहे, शिक्षण आहे, यश आहे आणि अश्या विविध प्रकारच्या  छोट्या मोठ्या मोहिमांसाठी आम्ही सतत आपल्या सेवेसाठी  सदैव तत्पर आहोत.

Plus Valley Trek (Post lockdown 1st trek on 22nd Nov 20 )

  आज अनलॉक नंतर पुन्हा एकदा सुरवात करतोय आम्ही ( HighWalk). मनामध्ये एक धास्ती होती की कसे होईल याची. म्हणून आम्ही १० जणांचा ग्रुप तयार केल...